मैञीण ..

Started by Çhèx Thakare, September 01, 2014, 12:57:59 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

#मैञीण..

'ति आणि मि फक्त चांगले मिञ आहोत बास्स,
  त्या पलीकडे काहीच नाही ..'

" नाही ..?, खरचं काहीच नाही ?? "

" खरं सांगू का मलाच माहीत नाही. हा प्रश्न मला सुद्धा
नेहमी सतवत राहतो,  पण मी त्याला मैञीचच नाव देतो.

माझ्यात तिच्यात तस काही नाही,  फक्त एक अट्याचमेंट
आहे,  अन ति अट्याचमेंट पण अशी आहे कि माझ्या शिवाय
तिला करमत नाही,  अन तिच्या शिवाय मला. "

" खरचं ईतके अट्याच आहे "

" आहे नाय होतो,  अता नाय ईतके अट्याच,  दोघे
एकमेकांना खुप चांगल्या पद्धतिने ओळखून सुद्धा
एकमेकांसमोर अनोळखी म्हणून वावरत असतो.  तिची मला
गरज आहे हे मी तिला कधीच जाणून देत नाही,  अन तिही
कधीच भासवू देत नाही.  गरज असली तरी आम्ही
एकमेकांकडे काही मागत नाही,  कारण जो हक्क होता तो
हक्क माञ आता राहीलेला नाही.  जितकी ओढ,  आग्रह, 
हक्क होता,  तो माञ मला दाखवायला आवडत नाही, 
मनातून वाटते कि जाऊन मन भरून बोलाव,  हक्कान भांडाव,
पण परत काही वेगळ होईल त्यामुळे मी काहीच बोलत नाही. 

मज्जा करताना खुप मजा केली,  पण बिझी शेड्यूल मुळे
मलाही जास्त वेळ देता येत नव्हता अन तिही जाँब मुळे
बिझीच होती.  "

" या मुळे तुम्ही बोलत नाही  ..? "

"नाही याच मुख्य कारण म्हणजे " ईगो ",  आता याला
तुम्ही एटीट्यूड म्हणा कि काही वेगळं,  पण मी माञ ईगोच म्हणणार.

खर तर ती अशी नाहीये,  पण ति बददली आहे, नविन मिञ जे
भेटले ना,  आम्ही आता जुने झालो,  आमची आठवण तेव्हाच
येते जेव्हा काहीतरी काम असतं,  अशी अठवण काढत नाही,  मी नात जपण्याच खुप प्रयत्न करतो पण, ति काही
ईंटरेस्ट घेत नाही,  मग मिच का नेहमी पुढाकार घेऊ ..?, 
मिच का गरज दाखवू  ..?,  मला मिञांची कमी नाही, 
मैञींणींची पण नाही,  हो खंत नेहमीच असते कि जिवाची एक
मैञीण माञ लांब होत चालली आहे.  "

©  चेतन ठाकरे