दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस

Started by केदार मेहेंदळे, September 01, 2014, 12:47:50 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस 
असा कसा हा बनून पाहुणा निघून गेला पाउस?

जरी थांबता, नखशीकांत मी, भिजून घेतले असते   
मनांत भिजले, क्षण काही मी, निवांतजगले असते 
पुसताना या, लादिवरच्या, ओल्या चिखल खुणा मी
गतायुष्याचे, पुसून ठसे मी, सुखात बसले असते ...पण
...............................................दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस 
...............................................असा कसा हा बनून पाहुणा निघून गेला पाउस?

शिखरावरती, कितीक पोहचले, करून माझा घातं 
दौडत गेले, धुरळा उडवत, विचकून त्यांचे दातं
सर एखादी जर, झरली असती, चेहर्यावरून माझ्या
उपेक्षेची पुसून राळ मी, झाले असते शांत... पण
...............................................दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस 
...............................................असा कसा हा बनून पाहुणा निघून गेला पाउस?

जुन्या गाढल्या, आठवणीना, आली असती जागं
वठल्या देही, रोमांचाची, फुलली असती बागं   
खिडकी मध्ये, बसले असते, गिळला असता हुंदका
भिजताना अन, दैवा वरचा, भिजला असता रागं...पण
...............................................दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस 
...............................................असा कसा हा बनून पाहुणा निघून गेला पाउस?

सखी सवे या, सुख दुख्खाच्या, किती रंगल्या गोष्टी
बोलत असता, हसले आणिक, कधी जाहले कष्टी
भास सर्व हा, कळता मजला, हिरमुसले मी जराशी
पावसा संगे, करू म्हणाले, जिव्हाळ्याच्या गोष्टी...पण
...............................................दरवाजातून नुसता आज डोकावून गेला पाउस 
...............................................असा कसा हा बनून पाहुणा निघून गेला पाउस?

केदार...

वरील कविता जेष्ठ कवियत्री अलकनंदा साने यांच्या ''दरवाजे से झांककर चली गई बारिश'' या हिंदी कवितेवर बेतली आहे.

शिवाजी सांगळे

केदार, फारच छान।
नुसती बेतलेली आहे कि अनुवादित?
मी मुळ हिंन्दी कविता वाचलेली नाहि म्हणून।
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

केदार मेहेंदळे

शिवाजी सांगळे

खरच छान कविता आहे, आता पुन्हा वाचल्यावर मलाही काही सुचू लागले आहे, यथा अवकाश पोस्ट करीन.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९