विरहात ती जाळून गेली!

Started by Anil S.Raut, September 04, 2014, 08:02:56 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

झोपडीत माझ्या ती
आज येऊन गेली,
होते चिमुकले सुख
ती ते घेऊन गेली !

सुखाच्या भरुन घागरी
सडा टाकेल अंगणी
भाबडी आशा माझी
येण्याने तिच्या फुलली

रेखून रांगोळी दुःखाची
होळी सुखाची ती करुन गेली!

दाखवला असता मी ही
झोपडीतुन तो चंद्र
साजरा केला असता
ध्यासातला तिच्या मधुचंद्र

ओढीने मखमलीच्या
भुईला ती हेटाळून गेली!

रचली मी शब्दांची चिता
शब्दांचेच माझे कफन
नकाे करुस प्रेम वेड्या
जे होईल असे दफन

फेकून चार थेंब प्रेमाचे
विरहात ती जाळून  गेली!
        -अनिल सा.राऊत