* बाप्पा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 08, 2014, 09:21:23 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* बाप्पा *
बाप्पा दर्शनासाठी तुझ्या रांगेत
सामान्य नागरिक तासनतास उभा असतो
VIP CELEBRITY माञ तुझ्यापर्यंत
काही क्षणातच पोचतो
आम्हाला होते धक्काबुक्की कार्यकर्त्यांची
आबाल वृध्द, महिला सारं काही भान
लोटतांना ती सपशेल विसरायची
सांग बाप्पा गरीबांन तुझं
दर्शन कशी बरी घ्यायची
भोळ्या भाबड्या तुझ्या भक्तजनांनी
यांची मुजोरी कुठपर्यंत सहन करायची
चरणस्पर्श घेताना तुझ्या पायावर बाप्पा
कार्यकर्त्यांनी का आमची डोकी आपटायची
सांग बरं बाप्पा अशा लोकांना
आम्ही तुझी भक्त कशी मानायची
आमच्या नशिबी कारे ही अवहेलना
या मंडळाच्या लोकांना बाप्पा
तु थोड़ी तरी सद्बुद्धि देना
एवढाच नवस मानलाय मी तुला
जाता जाता बाप्पा तेवढातरी
आज पुर्ण करशील ना...?
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

ravivarkute

tu gajmukh tuch maja sukh tuch majja kaiyvari.
pujto  tujh mi tuch majja vighn hari.
tuch maji maya tuch maji chhaya, tuch ganraya banla ahe man santi
tuch maja kaiwari......
@ravi@

धनराज भूमरे पाटील

खूप छान कविता आहे गणेश सर गणपती बाप्पा मोरया