अजून मेला नाही रावण

Started by श्री. प्रकाश साळवी, September 08, 2014, 11:52:11 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

अजून मेला नाही रावण

जरी घडले असले श्री रामायण
अजून मेला नाही रावण

क्षणोक्षणी चाले भ्रष्टाचार
पैशासाठी होई मानव लाचार
सत्याचे तर झाले खंडण
अजून मेला नाही रावण ।1l

सूडाने कुणी पेटून ऊठतो
माय पित्याला हाकून देतो
मना मनात द्वेषालाच मान
अजून मेला नाही रावण ।2।

ना नात्याचे कुणास बंधन
बापच करतो मुलीचे शोषण
कलंक आहे असले जीवन
अजून मेला नाही रावण ।3।

नाही राहीले जन लज्जेचे भान
माय भगिनींचा क्षणोक्षणी अपमान
सुवासिनीला घरात डांबून वेश्येला मान
अजून मेला नाही रावण ।4।

कुणी साधुचे सोंग घेऊनी
स्री भक्तांचे भोग भोगूनी
म्हणे मीच संत महान
अजून मेला नाही रावण ।5।

अमरत्वाचे वरदान रावणा
रामाने जरी घऊन प्राणा
जीवीत आहे रावण भावना
अजून मेला नाही रावण ।6।

श्री. प्रकाश साळवी.
दि. 06 सप्टें. 2014.

Anil S.Raut

मस्त वाटली कविता सर!
कवितेतले भाव अर्थपुर्ण आहेत पण शब्दमांडणीत थोडी गडबड आहे !
पुढील लेखणास हार्दिक शुभेच्छा!