कवी संजय निकुंभ यांचा मृत्यू ..

Started by विक्रांत, September 09, 2014, 02:10:43 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



शब्दावर प्रेम करणारा
स्वत:च्या कवितेत
हरवून गेलेला
कवी असल्याचा
अभिमान बाळगणारा
केवळ कवितेपुरताच
मित्र असलेला
आपला मित्र संजय
आपल्यात  नाही
त्याच्या कविता
कुणाला आवडायच्या
तर कुणी त्यांना
नाकही मुरडायचा
लिहिणे हे त्याची
गरज होती
कदाचित श्वासाइतकीच 
म्हणून त्या साऱ्याकडे
दुर्लक्ष करीत तो लिहित होता
व्रतस्थ योग्यासारखा
असा हा काव्य योगी
आता आपल्यात नाही
त्याच्या कवितेला कवीवृतीला
माझे लाख प्रणाम ...!

विक्रांत प्रभाकर

विक्रांत

कवी संजय यांचे अपघाती निधन झाल्याचे काल कळले. त्यांना श्रद्धांजली म्हणून सुचलेल्या काही ओळी..

santoshi.world