पशु

Started by केदार मेहेंदळे, September 12, 2014, 02:32:39 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

कधी कधी एखादा साधा, तुमच्या आमच्या सारखा माणूस काही तरी भयानक कृत्य करतो. त्याचा फोटो बघून या माणसांनी असं कसं केलं असेल याचं आश्चर्य वाटतं आणि माणुसकी वरचा विश्वास उडतो. त्या वेळेस माणसात दडलेल्या पशूची जाणीव होते आणि मग असं काहीसं वाटतं.   

पशु

...........................................................विसरलास जरी माणसा मला
...........................................................मी कुठे मेलोय अजून
...........................................................तुझ्या मनाच्या खोल अंधारात
...........................................................दबा धरून बसलोय अजून

विश्वात जेंव्हा अंधार होता
माझाच हिंस्त्र हुंकार होता
माणूसपणाचा मिळता शाप
मनात मला तू गाढला होता

स्वताला तू विसरला आहेस
अंधारातला तू पशुच आहेस
माणूसपणाच्या मेल्या थडग्यात
स्वता:स गाढून निजला आहेस

...........................................................अक्राळ विक्राळ दाढांचं
...........................................................अंगावरल्या केसांचं
...........................................................आठव तुझं रूप बिभित्स
...........................................................लांब लांब नख्यांच 

भुके साठी मारयचास तू
वासने साठी ओरबाडायचास तू
अजून कधी विखार भडकता
मलाच बाहेर काढतोस तू

दावतोस जेंव्हा चुणूक माझी
दात विचकून हसतो मी
सत्ता माझी मजबूत कराया 
माणुसकीला चुरगळतो मी

...........................................................पशुपणाला दडवशील किती
...........................................................कुचक्या संस्कार कचकड्यांनी
...........................................................पाशवीपणाला दडपशील किती
...........................................................माणूसपणाच्या बेड्यांनी

अंधारातले आपण पशु आहोत
माणसात लपून बसलो आहोत
आज नाही तर उद्या नक्की
पिळपीळा सूर्य गिळणार आहोत

ह्या विश्वात मग अंधार असेल
आपलाच हिंस्त्र हुंकार असेल
अंधार राज्यात माणूसपण चिरडण्या   
पशुपणाचा आपणास उश्शाप असेल

...........................................................विसरलास जरी माणसा मला
...........................................................मी कुठे मेलोय अजून
...........................................................तुझ्या मनाच्या खोल अंधारात
...........................................................दबा धरून बसलोय अजून


केदार...