जपून अंतरी ठेवा जखमा

Started by Anil S.Raut, September 14, 2014, 03:36:45 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

खटयाळ वारा शीळ वाजवी,सळसळ हिरव्या रानाला
नभात रवी आग शिजवी,तळमळ कोवळ्या पानाला!

क्षणात इथे तिथे सावली,पाठशिवणीच्या या खेळाला
म्हणू कसे थांब निर्झरा,खळखळ वाहत्या घामाला!

गर्जत येई मेघ सावळा,नाही कसा कोसळला?
तुतारी चातकाची क्षीण रे,भेदेना ती गगनाला!

हंबरुन गाई उपासलेल्या,पुकारती रे अंबराला
उघड्या डोळी निरोप देती,लेकरांच्या रे प्राणाला!

असाच सरता ऋतू भिजवा,रोमांच कुठले प्रेमाला?
जपून अंतरी ठेवा जखमा,कुरवाळत रे वेदनेला!


*अनिल सा.राऊत*
9890884228