विसर

Started by शिवाजी सांगळे, September 14, 2014, 06:31:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




उगीच घेतो, शोध सुखाचा
काय दिले, काय मिळविले?
शोधून वाटलेले, सुख सारे
मृगजळा परी, उडूनी गेले !

पुरवूनी देहाचे, लाड सारे,
वेदनाच देही, उरती खऱ्या,
करूनी उपाय, शिवून जखमा
शल्य दुख:चे, शाश्वत साऱ्या !

जाणुनी सुद्धा, भोग कर्माचे
कळेना मानवा, सार जीवनाचे,
वेदनेत केवळ, सत्य जन्माचे 
पडतो विसर, तया परमार्थाचा !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

केदार मेहेंदळे


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९