ये फिरूनी...

Started by शिवाजी सांगळे, September 16, 2014, 12:33:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ये फिरूनी...

नभी दाटूनी मेघ भरले 
फिरूनी तो पाऊस आला,
थेंब ओला डोळा माझ्या
सजन माझा परदेस गेला !

साथ तूजला देतसे दामिनी
अंगणी मज कडकडाट झाला,
कारे असा बरसतो वेडा
जीव माझा घाबरून गेला  !

यावे सत्वर फिरूनी  पुन्हा
जाशिल परतूनी ठावे मजला,
हुरहूर मज चिंब भिजण्याची
आण माघारी प्रिय सजनाला !

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९