कळलेच नाही

Started by dipakmuthe, September 18, 2014, 12:52:00 PM

Previous topic - Next topic

dipakmuthe

कसे गेले ते बालपणीचे रम्य दिवस
कळलेच नाही ......
आठवणींचे रंग हातावरी ठेवून
ते नाजूक फुलपाखरू ......
कधी उडून गेले कळलेच नाही .......
आई वडिलांची करंगळी धरून चालता चालता ।
कधी मोठे झालो कळलेच नाही ....
उनाडपणाला त्या बालपणीच्या
जाणिवेची किनार कधी आली कळलीच नाही ....
हवीहवीशी ती नाती
कधी विसरून गेलो कळलेच नाही ...
आयुष्याच्या या पानावर
आठवणीचे गोड क्षण कधी उमटले
कळलेच नाही.. कळलेच नाही
दीपक मुठे