* देवा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 19, 2014, 12:48:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* देवा *
ह्रदयात माझ्या रं देवा
तुझंच होतं ना गांव
मनामधी  होतास तु
अन ओठांवर तुझं नाव

दिसरात  केली रं पुजा
वाहिला डोंगरफुलांचा बाग
धुपध्यान केलं तरी
कमी पडलो का सांग

सदाचाराचा अवलंबुन मार्ग
चालत राहिलो मागं
मग का रं देवा तरी
भरल्या संसारात लावली तु आग

सारं होत्याच नव्हतं केलं
माळीण गांव माझं उध्वस्त केलं
काय कमी पडलं तुला
कशाची रं सुटली हावं

भोळ्या भाबड्या जीवांवर घातलास घाव
दिसंना कुठे मला माझा गांव
चिखलात शोधितो मिळेना ठावं
दगडाच्या मुर्तीत राहणा-या दगडां
म्हणु कसा आता तुला देव

ह्रदयात माझ्या रं देवा
तुझंच होतं ना गांव
मनामधी होतास तु
अन ओठांवर तुझं नाव...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264.
Mumbai.