* तुझी माझी लव्हस्टोरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 20, 2014, 08:05:20 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* तुझी माझी लव्हस्टोरी *
तुझी माझी लव्हस्टोरी
राहिली अधुरी
जुळली होती प्रित आपुली
मग का ही दुरी

तुच होतीस माझी स्वप्नपरी
स्वप्न माझी भंगली तरी
तुकड्यात विखुरली गेली
तुझी माझी लव्हस्टोरी

भोळ्या मनाची कथा माझी
भेटशील तेव्हा सांगेल कधीतरी
तुझ्याविना करतेय सोबत मला
तुझ्या माझ्या आठवांची डायरी

उलगडली पाने आयुष्याची
कोडे पडतात पुन्हा तरी
चुक झाली नेमकी कुणाची
याच शोधात जिंदगानी सारी

तुझी माझी लव्हस्टोरी
राहिली का अधुरी...?
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai