ती, मी अन खुर्ची ..

Started by विक्रांत, September 21, 2014, 12:07:28 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



खुर्ची अन मी
बाजू बाजूला
दरवाजा अडवून
गॅलरी जवळ
उभे होतो...

ती तणतणत
आली अन
लाथेनेच खुर्ची
बाजूला केली ...

खर तर
तेव्हा
ती खुर्ची म्हणजे
मीच होतो .

विक्रांत प्रभाकर