* भाकर *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 21, 2014, 06:54:40 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* भाकर *
चार दिवसांपासुन पोरं माझी उपाशी होती
भाकरीच्या तुकड्यासाठी सा-या गावभर हिंडली होती
पण पदरी फक्त निराशाच पडली होती
बघुन त्यांचे चेहरे मी आतल्या आत जळाली होती

स्वता जाउन भिक मागावी म्हणुन मी उठली
फाटक्या साडीला पुन्हा ठिक करुन नेसली
घरोघरी जाउन भाकरीसाठी आवाज देउ लागली

लोकं भाकर देण्याच्या बहाण्याने जवळ बोलवु लागली
वासनात्मक नजरेने माझ्याकडे पाहु लागली
म्हणुन मी त्यांना टाळत पुढे जाउ लागली
पण सगळीकडेच तेच चित्र म्हणुन हताश झाली

मग पुन्हा डोळ्यांसमोर पोरांची भुकेली तोंड दिसली
तेव्हा मला इज्जतीपेक्षा भुक महत्वाची वाटली
म्हणुन मी एका घरात भाकरीच्या तुकड्यासाठी
शरीराचा सौदा करुन भाकरी घेउन घरी पतली

आज मला एक गोष्ट कळाली होती
इज्जतीपेक्षा भाकरीची किंमत जास्त होती
शेवटी इज्जत गहाण ठेउनच तर
मी आज पोरांना भाकर दिली होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai