बाळाचा वाढदिवस ( ॐकार)

Started by vilas shahasane, September 22, 2014, 08:27:08 PM

Previous topic - Next topic

vilas shahasane

आईच्या पदराखाली बाळ तीळ तीळ वाढतो
पहिल्या वाढदिवसाचा दिन नकळताच येतो
बाळाच्या पाहूनी गोड गोड लीला
आईने हरवून टाकले बाई स्वत: ला
चिमुकले पाहूनी हात त्याचे
आई म्हणते, या इवल्या हाती लपले दिन भाग्याचे
तीट लावताना बाळाला आई म्हणते,
बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई
पाहूनी वाढदिवसाचा सोहळा
आई म्हणते, आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
बाळाचे सर्वांनी केलेले कौतुक पाहून
आई म्हणते, मज स्वर्ग नको मज नकोच ती पूण्याई
हे भाग्य पूरे की मी बाळाची आई
सौ. मनीषा शहासने.