* तो *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 22, 2014, 08:31:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* तो *
एका चांदण्या रातीला तो
कुठल्यातरी विचारात बसला होता
टक लावुन सारखा तो
त्या चंद्राकडे बघत होता

असा कोणता प्रश्न तो
त्या चंद्राला विचारत होता
कहानी अंधाराची जणु तो
प्रकाशाला मुकपणे सांगत होता

मनात लपलेले काहीतरी तो
स्वताच स्वताशी बोलत होता
चेहरा असा कुणाचा तो
त्या चंद्रात शोधत होता

एका चांदणीकडे पाहुन तो
रहस्य कुठले दडवत होता
नको असलेल्या एकांतास तो
साथ कुणाची मागत होता

त्याच्यापुढे आता चंद्र तो
किती निस्तेज वाटत होता
मुक्या शब्दांचा अबोला, तो
हजार शब्दांनी बोलत होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.