पाळणाघर

Started by vilas shahasane, September 22, 2014, 08:37:46 PM

Previous topic - Next topic

vilas shahasane

ममा मला पाळणाघरात नको ना ग ठेवू
मी आहे ना तुझ चिमुकल लाडक तान्हूू
घरात नाही का माझ्या आजी मावशी
नसेल तर ओळख करून दे माझी चिऊ काऊशी
माझे मन नाही लागत पाळणाघरापाशी
ममा माझी कळत नाही का तुला भाषा
जाताना तिथ इवल्या हृदयावर किती येते निराशा
तिथ संभाळायला असते आम्हा दाई अम्मा
पण तिच्यात आम्हा दिसत नाही आमची ममा
ममा तुला वाटत आम्ही तिथ असतो रमत
पण तिथ असतो आम्ही आई आजी मावशी शोधत
खरं निरागस प्रेम तुम्ही आम्हा चिमुकल्यांकडून शिकाव
आणि आम्ही मात्र तिथ कृत्रिम प्रेमात रमाव
ममा मला पाळणाघरात नको ना ग ठेवू
मन माझ घरातीलच अंगणात रमत पाहू
बाललीला पहाण फारच मोठी पर्वणी
ममा मला ठेव ना ग आपल्याच अंगणी
तू न्यायला आल्यावर पायात बेडी घातल्यागत येतो धावत
ममा, तेव्हा तुला कळत नाही का घरात कसा मी असतो बागडत
ममा, पाळणाघराची आजकाल झाली आहे फॅशन
आणि बालपणावर आमच्या आले आहे कडक अनुशासन
बालपणीच कोवळ्या मनाला किती मोठी ही शिक्षा
याची तक्रार करणार आम्ही देवबाप्पाकडे
आमच्यातर्फेच बाप्पा पाठविणार तुम्हा वृध्दाश्रमाकडे
सौ. मनीषा शहासने.