चार ओळी

Started by Pravin Raghunath Kale, September 23, 2014, 11:02:16 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale


समोरच्या पक्षातील
प्रत्येकच भ्रष्ठ असतो
पक्षातरानंतर मात्र
कावळाही बगळा असतो

निवडणुकीचा काळ म्हणजे
नाटकाविना हसवणूक असते
एकमेकाची टिंगल खेचून
बिनातिकीटाची करमणूक असते


जागावाटपाचे दिवस म्हणजे
खेचाखेचाची स्पर्धा असते
मीच मोठा सांगताना
मोठ्या मनाचा अभाव असतो


प्रविण रघुनाथ काळे
8308793007