* नकार *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 24, 2014, 10:22:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* नकार *
असं कसं रे प्रेम होतं तुझं माझ्यावर
भाळला होतास तु माझ्या ज्या सौंदर्यावर
ऐकुन नकार माझा फेकलंस तेजाब त्याच चेह-यावर
असह्य वेदनांनी कळवळुन पडली शेवटी मृत्युशय्येवर

मला होती बंधने समाजाची अन होतं घरदार
होता आईवडीलांचा विश्वास अन त्यांचे संस्कार
एकुलती एकच रे होती मी मुलगी त्यांची स्वप्न करायला साकार

जरा तरी केला असता रे तु याचा विचार
तु तर तेजाब फेकुन माझ्यावर झालास पसार
मी माञ तिथेच तडफडत सोसत होती वेदनेचे अंगार
फारच मोठे शौर्य केलंस झालास का प्रेमवीर

प्रेमाची व्याख्या बदलवलीस तु आता प्रेम कोण करणार
प्रेमाच्या नावाची ही भीती सर्वदुर पसरणार
त्याग अन बलिदानाने प्रेम मोठं होतं
हे तुम्हा नादान प्रेमवेड्यांना कधी कळणार...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.