अजस्त्र पहाड

Started by विक्रांत, September 25, 2014, 11:28:55 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

एक पहाड प्रचंड कातळी
अजस्त्र हात पसरून
उभा आहे कधीचा   
सारी वाट अडवून
प्रत्येक प्रहार आवेगी
सपशेल व्यर्थ करणारा
छिन्नी हातोडी पोलादी 
प्रत्येक भग्न करणारा ...
खुंटलेली हरेक वाट
वळून वाकवून फिरफिरून   
तिथेच येते अगदी काहीही करून  ..
खेळा अलिकडे हवे तेवढे
रस..रंग..रूप.. मेळा
नाव..सत्ता..प्रतिष्ठा..
कितीही करा गोळा
मातीला तुमची कीव येईपर्यंत ..
पुढे जायच्या पण नकोच बाता.
एक म्हातारा थरथरत्या मानेचा
तेवढ्यात न कळे येतो कुठून
अनघड गोष्ट एक सांगतो रंगवून
पटते जी नच पटून
मनात बसते पण खोल घुसून
तो सांगतो.. 
कुठल्यातरी गूढ रात्री
वितळतो पहाड पुढे सरते वाट 
अन पुढे गेलेला वाटसरू
येत नाही कधीच परतून
त्यासाठी पण
प्रत्येक रात्र जागे राहावे लागते
अन आपण आपल्या पाहण्याला
सदैव पहावे लागते

विक्रांत प्रभाकर