सामान्यांची व्यथा

Started by aap, September 28, 2014, 04:00:50 PM

Previous topic - Next topic

aap

सामान्यांची व्यथा

आम्हा हवी दोन वेळची मीठभाकर
शांत ,स्वच्छ ,सुरळीत करभार
मुलभूत गरजांची आम्हा कांस
इतुकीच आमुची आस
सांगतो सामान्य आपुली व्यथा
ऐका हो राजकारण्यांची कथा
जातीपातीचा व्यवहार
घोटाळे ,भ्रष्टाचार
खून ,दरोडे बलात्कार
व्यभिचार ,अनाचार
नैतीकतेचा दुराचार
अंदाधुंदी कारभार
दंगली ,जाळपोळ
साठेबाजी ,काळाबाजार
भाषा ,सीमावाद
पोलिसांचा लाठीमार
समाजाला लागली कीड
बरबटला देश
या विशेषणांची वाटे लाज
येईल कधी हो रामराज
संपणार कधी धिंडवडे
शिकतील कधी सन्मार्गाचे धडे
देवा कधी हे थांबणार
त्यासाठी तुला घ्यावा लागणार कारे अवतार
या देशाचा आम्हा आहे अभिमान
लज्जेने झुकवू नका याची मान
                           सौ . अनिता फणसळकर