दगडाला जिव लावला...

Started by virat shinde, September 29, 2014, 08:15:30 AM

Previous topic - Next topic

virat shinde

लोक जीवाला जीव लावतात
मी दगडाला जीव लावला
माहीत नव्हते मला
दगडाला काळीज नसते ते....
किती जखमा झाल्या काळजाला,
माझेच मला कळले नाही
तरीही,
राहिलो कवटाळत त्यालाच..
अन्
तो माञ
शोषीत राहिला माझे रक्त!
आज  झालो मी घायाळ
तुटले ह्रदय माझे आण
नुसताच तळमळतोय मी ....
अन् तो माञ ,
कुणाचं काही नसल्यासारखा
नेवुण बसवलाय...देव्हा-यावर
पुन्हा शेंदुर फासुन द्यायला!

अरे दगडा ....
तुझं विसर्जन मीच करतोय
अन् तेव्हा, तुझेच विखुरलेले तुकडे
तुलाच कसे ओरबाडत असतील

तु तर दगडच ना, नाही तु ला जिव ना जिव्हाळा
माणुसपण जपतो आम्ही
दगडाला नाही थारा,
तुझा कितीही गुरगुरला वारा
तरीही तु दगडच सारा....

कवी-अनिल सा.राऊत
संपादित-विराट शिंदे

Anil S.Raut

हे बघा विराट साहेब..माझ्या कवितेत लुडबूड करण्याचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही 
आपल्याला जी काही बुध्दी पाजळायची आहे ती स्वतःच्या कवितेतून पाजळा!
पुन्हा असे होवू नये एवढीच माफक अपेक्षा !

मिलिंद कुंभारे

nice one........

good editing by Virat........

Anil........think positive......be positive...... :)

virat shinde

माफ करा अनिल सर भावनेच्या भरात जरा जास्तच काही करून बसलो आस वाटतयं. तुमच्या कवितेत लुडबूड करण्याचा अधिकार नाही याची मला जण नव्हती.
यानंतर मि माझी जी काही बुध्दी पाजळायची आहे ती स्वतःच्या कवितेतून नक्कीच पाजळीन.
या कृती बद्दल ह्रदया पासुप माफी मागतो.