दुनियादारी

Started by anuswami, September 30, 2014, 03:36:22 PM

Previous topic - Next topic

anuswami

*****दुनियादारी*****

त्याला ती आवडली अन्
म्हणे तो तिच्या प्रेमात पडला
त्याची लव स्टोरी सांगताना
काल तो माझ्यापाशी हुंदकुन रडला



म्हणाला,

तिलाही मी आवडत होतो
प्रैक्टिकल ला आमची भेट व्हायची
एकटक तिला पाहत राहिल की
ती लई भारी क्यूट स्माइल द्यायची



तिच्यासाठी मी सगळ सोडल
दारू, गुटखा, मावा, सिगरेट
तिचीच भेट व्हावी म्हणून
कधीच नाय सोडल कॉलेज च गेट



तिच्या बापाला वाटत होत
कधी एकदा तीच लग्न उरकिन
आता त्याला कस सांगायच
तीच माझ्या काळजची मालकिन



नाय रहावल मला बघ
अन तिला मी प्रोपोस केला
उत्तरच दिल नाय सालीनं
माझा कलिजच फेल गेला



एका यारानं सांगितल मला
झालाय परवाच तिचा साखरपुडा
लवकरच भरेल आता ती
हातात तिच्या लग्नाचा चुडा



पाणी येउन राहिल डोळ्यातन
पैरोताले जमिन खिसकली
काय बोलू पुढ आता
बोलताना माझी जीभच फिसकली



दारू पण चढत नाय रे आता
कालच तिच्या गळ्यात मंगळसूत्र मी पहिलो
दुनियादारी झाली यार माझी
ती 'सुरेखा'
अन मी 'दिग्या' होउन राहिलो........

कवी - अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८