असंच करीन म्हणतो!

Started by केदार मेहेंदळे, October 01, 2014, 04:09:53 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

पक्ष बुडवला पुरात जरी मी   
पूरग्रस्तांना वाचविन म्हणतो
जहाज फुटले लाटेनी पण     
फळकुट धरुनी तरीन म्हणतो 

पूर येथला कधीच सरला
जवान येथे अविरत श्रमला
मम्मी संगे आता छान मी
नंदनवन हे बघीन म्हणतो

''खेल खेल मे'' दशक संपले
चिखला मध्ये हातही मळले
कमळ येथल्या चिखला मधले
या हातांनी खुडीन म्हणतो

ज्याच्या संगे पाट मांडला
तोच दादला छळू लागला
कणखर होवुनी हातावरचे
घड्याळ आता फेकीन म्हणतो

विरोधकाचे स्थानही गेले
करण्या काही काम न उरले
वेळ कारणी आता लावण्या
संसदेत मी झोपीन म्हणतो


(खी... खी... खी... खी... खी...........)

केदार...


मिलिंद कुंभारे

ha.....ha....ha...... ???

kedar da.....nice one.... :)