तो क्षण

Started by nirmala., October 31, 2009, 02:38:47 PM

Previous topic - Next topic

nirmala.

-- तो क्षण

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.

स्वप्नांचा झुला मनात नेहमीच झुलत असतो,
माझ्या समवेत असताना तो नेहमीच बेभान असतो.

दोघांचे हि श्वास मग स्थिरावलेले असतात,
त्याच्या बाहुपाशात हात माझे जखडलेले असतात.

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

हळुवार पणे मग मने आमची बोलत असतात,
आयुष्यातल्या त्या सुंदर क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असतात.

- निर्मला बोरकर. :)

rudra


santoshi.world

खूप छान कविता गं ... अगदी माझ्या मनाचं प्रतिबिंब .................. शुद्धलेखनाच्या चुका आहेत काही ........ दुरुस्त कर त्या  ........ :)

Prachi

Khup chan.... feel hot vachtana...

सूर्य

तो क्षण..

आयुष्यातला तो क्षण किती छान   असतो
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो

स्वप्नांचा झुला मनात नेहमीच झुलत असतो
माझ्या समवेत असताना तो नेहमीच बेभान असतो

दोघांचे हि श्वास मग स्थिरावलेले असतात
त्याच्या बाहुपाशात हात माजे जखडलेले असतात

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते
पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते

हळुवार पाने मग माने आमची बोलत असतात
आयुष्यातल्या त्या सुंदर क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असतात.
                                                 - निर्मला बोरकर.

[purple]


खुप छान निर्मला जी अजुन लिहत रहा आपले लिखाण फार छान आहे

shashaank