जलपरी

Started by suhas shrirang kolekar, October 02, 2014, 12:21:18 AM

Previous topic - Next topic

suhas shrirang kolekar

सहजच गेलो नदी किनारी
अवचित भेटली एक जलपरी
आलास सुंदर तरूणा कुठूनी
स्मितवदनी ती मला विचारी

जळात नेले तिने मला
परी चित्त असे ते तिरावरी
गेली घेउन सरळ पित्याकडे
उरात माझ्या धडकी भरी

वदे तिचा तॊ पिता महान
असा कसा तु तरूण निरंतर
उपवर असे हि कन्या माझी
हॊशील का तु तिचा वर

नाजुक मुरडे,कन्या लाजे
करावे काय हे मला न समजे
म्हणे मला ती कॊपराने ढोसूनी
जोडी तुझी नी माझी साजे

मी ही भुललॊ, बांधू लागलो इमले
अवघे जलराज्य पायाशी आले
एवढे वैभव लोळे पायाशी
येती शहारे परीच्या स्पर्शासरशी

खरंच ! अंगाला गारवा झॊंबू लागला
ओला स्पर्श हाताला झाला
परीचा आवाज अचानक कणखर बनला ,
"ओ महाराज !" स्वर कानी पडला ..!

उठून पाहतॊ तॊ पॊलिसाची काळीकभिन्न आकृती
दात वेंगाडुनी पुसे मला
"पाण्याशी वाटे काय प्रीती!?
झॊपता चक्क पाण्यामध्ये...
अजब बुवा तुमची नीती
अजब बुवा तुमची नीती...!!!

कवी -सुहास श्रीरंग कॊळेकर, तुळजापुर.
. . . . ९४०४५१३८५८

सतिश

Concept छान आहे तुमचा पण काही ठिकाणी लय सुटते... तरीही छान..!!