माझ्या प्रेमाची स्मित कहाणी .....

Started by राम पाटील (स्मित), October 02, 2014, 12:07:28 PM

Previous topic - Next topic

राम पाटील (स्मित)

भेटतील का रे देवा ............
तिचे नि माझे प्रेमाचे क्षण
श्रवनातल्या पालवी प्रमाणे फुलले आमचे प्रेम ,,,
भेटतील का रे देवा पुन्हा ते सारे क्षण..........
भेटीच्या आतुरतेने .....
घरी थापांचे लावलेले क्षण
कॉलेज च्या नावाखाली क्रांती हॉटेल मध्ये
रुचवलेले चहाच्या कपा बरोबरचे प्रेम ....
आठवेल का रे देवा तिला ,,,,,.......
दोघामध्ये एकच घेतलेला वडापावचा क्षण
आणि आठवेल कारे देवा तिला
तो वडापाव खाताना नकळत झालेला प्रेम स्पर्श .
सगळे काही नवीनच होते देवा ..
माहित न्हवते देवा तुझ्या मनातला खेळ .
आठवेल कारे देवा तिला ,
काळजी पोटी ओठातून आलेला ..जेवलास कारे पिल्या ...तो क्षण .
मैत्रीनिच्या नावाखाली चोरून केलेले तिने फोन
चुकून आईने उचलल्यावर आपल्याच धनाजीचा होता ग फोन .
आठवेल कारे देवा तिला,
लग्नाची मागणी घातल्यावर बापाची ती भयंकर ओळ
आणि आठवेल कारे देवा तिला
बापाला मनवण्यासाठी भाऊ तात्यांची मध्यस्ती आणि बापाची मस्ती
शेवटी झालीच ती दुसर्याची ..मला जाळ्यात अडकून .
                                          स्व रचित  राम पाटील ,,कोल्हापूर
                                               ९९२२५५४६९१