गोष्ट पिसाळलेल्या भावांची ……

Started by shaan@5, October 02, 2014, 06:37:47 PM

Previous topic - Next topic

shaan@5

गोष्ट पिसाळलेल्या भावांची ......

एक होता राम एक होता रावण
हाव होती दोघांना हि सत्तेची
कास त्यांनी धरली होती महाराष्ट्राची
ऐका.. हि आहे गोष्ट दोन पिसाळलेल्या भावांची

राम म्हणे घेऊन साथ सर्वांची ,पार करू परीक्षा निवडणुकीची
गोड गोड बोलण्याला हरखली मंडळी दिल्लीची
वेळ आली परीक्षेची राम म्हणे , खुर्ची माझी मुख्यमंत्र्याची
पडली ठिणगी , तुटली साथ हरवली किल्ली महाराष्ट्राची   
हि आहे गोष्ट दोन पिसाळलेल्या भावांची

रावण आमचा इंजिन घेऊन धडाडे रेल्वेची
त्याला न साथ न सोबत कोणाची तरी पण
सकाळ दुपार संध्याकाळ काळजी त्याला महाराष्ट्राची
उठ सुठ त्याचे इंजिन चाबी मागे सत्तेची
हि आहे गोष्ट दोन पिसाळलेल्या भावांची

रामाला सवय विसरण्याची तर रावणाला अभद्र बोलण्याची
राम विसरला कुणामुळे आली भारतात शान महाराष्ट्राची
रावणाला तर काहीच कळेना सदा  म्हणणे किल्ली द्या सत्तेची
हि आहे गोष्ट पिसाळलेल्या दोन भावांची

अरे देणगी तुम्हाला थोर पुरुषांच्या  नेतृत्वाची ,जाणार कधी सवय कर्म दरिद्रीपणाची
ज्यांनी दिली साथ तुम्हाला अन दाखवली वाट यशाची
गुणगान गाता गाता अचानंक करता तुम्ही चेष्टा त्यांची
आता घेत सहारा थोरांचा अन पाहता स्वप्न सत्तेची
खरच हि आहे गोष्ट पिसाळलेल्या दोन भावांची

वेळ आहे, कशाला करता माती थोरांच्या मेहनतीची
सोडा सत्तेची हाव, अन करा स्वप्न पूर्ण तुमच्या बाप अन काकांची
तो दिवस दूर नाही, मोडून पडेल रामाचा बाण अन थंडावेल वाफ रावणाच्या  इंजिनाची
तेव्हा कळेल किंमत तुम्हाला बापजाद्या महाराष्ट्राची ...
अन कथाच संपून जाईल दोन पिसाळलेल्या भावांची !!!

जय महाराष्ट्र