स्वच्छतायान...

Started by शिवाजी सांगळे, October 03, 2014, 02:06:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वच्छतायान...

स्वच्छता पुन्हा पुन्हा
संकल्प असा सुटला,
कसं, करावं म्हणता
लोकांचा धीर तुटला !

एका दिवसा साठी
जोश सर्वत्र पसरला,
फोटो काढून घेणारया
लोकांचा बाजार भरला !

स्वच्छ कपडयां हाती
आधुनिक झाडू आला,
लगबग पाहून त्यांची
सफाईगार पण हसला !

तेंव्हा चष्म्यातून बापुंना 
भारत स्वच्छ दिसला,
चौकटीत प्रयोग फत्ते,
चौकात खेळ फसला !

©शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सतिश


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९