* पोलीस बाबा *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 04, 2014, 12:51:38 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* पोलीस बाबा *
बाबा एका सणाला तरी
या हो तुम्ही घरी
विचारतात गल्लीतली
पोरं मला सारी
दिवाळी-दस-याच्या सणाला
बाबा तुझा येणार का कधीतरी
काय सांगु आता त्यांना की
बाबा माझे आहेत पोलीस
बंदोबस्ताने त्यांना धरलंय वेठीस
सणासुदीच्या काळात सुट्टी नसते बाबाला
गणपति आला, दुर्गा माता आली की
बाबा माझा ड्युटीसाठी उभा रस्त्यावरी
थकुन भागुन बाबा जेव्हा येतात घरी
पोरगा जेवला ना?  म्हणुन आईला विचारी
तरसतो मी दिसभर ज्या प्रेमासाठी
तो मायेचा हात राञी डोक्यावरुन फिरी
माय माझी मग बोलु लागते,
पोरानं आपल्या आज हट्टच केला
म्हणे बाबांसोबतच करणार दिवाळी साजरी
दरवाजात बसुन वाट तुमची बघत राहिला
जड पावलांनी मग तो माघारी परतला
फटाक्यांचा बाक्स तसाच राहिला
न जेवता रडवेला होउन पोर झोपुन गेला
ऐकुन मायेचे बोलणं माझ्या बाबांचा कंठ दाटुन हो आला
मोठ्या कष्टाने बाबा माझा एवढंच बोलला
पोरां ॠण तुमच्या प्रेमाचं चुकवेल एकदातरी
राहिलंच आता, तर फेडेल पुढल्या जन्मी कधीतरी...!
कवी-गणेश साळुंखे...!
दि:- 20/08/2013
Mob -7710908264
Mumbai.

Nayan2014