भांडण

Started by madhura, October 04, 2014, 09:15:09 PM

Previous topic - Next topic

madhura


आज खूप कंटाळा आला
ब-याच दिवसात भांडलो नाही
ब-याच दिवसात
तिची कुरकुर ऐकली नाही
सालं हे काय आयुष्य आहे
बिना भांडत जगत राहायचं
असं जगायचं म्हणजे अशा जगण्याला
चिकन बिर्यानिची काय मजा आहे ...?
साला हा देश नाही
हा परदेश आहे
येथे भांडायचं नाही
हे म्हणजे अतीच आहे
तिला म्हणालो तू भांड माझ्याशी
ती बघत बसली
अहो येथे आपण नुसते बोलतो
तर बाजुवाल्याना
आपण भांडतो असेच वाटत असते
परवाच कोणी तक्रार केली
शेजारचे भारतीय भांडत आहेत
पोलिस आले
भारतीय म्हणाले
आमचे भांडण नाही
हे प्रेमाचे कुजबुजणे आहे
अहो आपली भाषाच अशी आहे
बोललो तरी भांडलो वाटते
आपली मराठी भाषाच
आपला बाणा आहे
ह्या परदेशात
बायकोशी भांडायचं
म्हणजे थोड अवघड आहे
येथे नुसते कुजबुजले
तरी त्याना भांडतो
असे वाटते आहे
शप्पत
तरीही मी
कधीतरी भांडणार
एवढे मात्र नक्की आहे ...

प्रकाश