तो असा यावा ......

Started by durga, October 05, 2014, 01:28:19 PM

Previous topic - Next topic

durga

गारवा बनुन तो आयुष्यात यावा
सुखाची बरसात घेउन तो यावा
पाकळ्यांची आस आहे मला
पारिजातका चा सडा बनुन तो यावा
चालेल रस्ता काटयाचा ज़ेव्हा
सोडून त्याने त्याची प़ाउलवाट यावी
बुडता बुडता किनारा गवसवा मला
होऊन माझा आधार लाट तो यावा
आसवात असेल कधी मी चिंब भिजलेली
मेघातुन बरसात घेउन तो यावा
आजवर या कुट्ट काळोखात जगले
प्रकाश होउन घरी सांजवतिचा दीवा बनुन तो यावा
आसवात कधी आभाळ पाहील नाही
उधळून चादंण्यात चादंरात बनुन तो यावा
मी एक निवडूंग वाळवटांतील एकटी
होऊन हिरवळ या श्रावणात तो येईल..♥♥

              दुर्गा
        9730246654