स्वपना तील प्रेम माझे ...

Started by durga, October 06, 2014, 04:58:42 PM

Previous topic - Next topic

durga


कोणाच्या तरी येण्याने माझ ही
आयुष्य कधी बदलून जाईल
माझ सारं जगच त्यांच्याभोवती
फिरू लागेल

जिवंत पनात एक क्षण मरण
यातला फरक समजू लागेल
नाही नाही म्हणता मी ही
कधी प्रेमात पडू लागेल
कधी हसायच विसरून गेले तर
तो हसायला शिकविल

खऱ्या अर्थाने हे जीवन
जगायला शिकवेल

पण भीती वाटते एक दिवस जेव्हा तो दूर निघून जाईल....
माझ आयुष्यच मग अर्थशून्य वाटू लागेल
त्यांच्या प्रेम मधुर आठवणींमधे वेडं मन झुरू लागेल

कारण प्रत्येकालाच गरज असते
एका साथीदाराची,
तशीच मलाही आहे
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात
रंगुन जीवन जगण्याची
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात
अखंड बुडन्याची ....

                     दुर्गा वाड़ीकर
                        9730246654

सुमित

#1
@ अप्रतिम खुप छान @

प्रत्येकालाच गरज असते
एका साथीदाराची,
तशीच मलाही आहे
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात
रंगुन जीवन जगण्याची
तिच्या गोड गुलाबी स्वप्नात
अखंड बुडन्याची ....

सुमित ९८६७६८६९५७