माझी माय

Started by Kaustubh P. Wadate., October 06, 2014, 07:47:57 PM

Previous topic - Next topic

Kaustubh P. Wadate.

माझी माय

इतकी सौम्य जणू ही दुधावरील साय,
वासरासाठी झटणारी ही गाय,
आहे ही एक जीवन घडवाय,
मला घडवणारी ही माझी माय.

एखाद्या फुलासारखे जपते ही मला,
सांगते या जगात धीट राहायला,
डोळ्यात पाणी आणणारे हिचे मन वढाय,
मला घडवणारी ही माझी माय.

हिच्या सावलीखाली ऊब खूप असते,
निराशेच्या थंडीत ही मायेची चादर अंगावर देते,
हिच्या मायेमुळेच मी घडतो हाय,
मला घडवणारी ही माझी माय.

हाताला आहे तिच्या एक मधुर चव,
सारे पदार्थ बनवणारी अन्नपूर्णा तिचे नाव,
लक्ष्मीचे आहेत तिचे पाय,
मला घडवणारी ही माझी माय.

मी खूप मोठा झाल्यावर देईन तिला सावली,
सुखात ठेवुनी तिला आठवीण ही झटणारी माऊली,
तिला प्रत्येक क्षणी सुखी ठेवण हाच तिचा न्याय,
मला घडवणारी ही माझी माय.

-कौस्तुभ प्रकाश वाडते