प्रेम एकदा करायचय !

Started by सुमित, October 06, 2014, 10:51:21 PM

Previous topic - Next topic

सुमित

एक काम अजून करायचय
कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय..

ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय
रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय..

ती ठेवेल डोक खांद्यावर म्हणून, तिच्या अगदी जवळ बसायचय
कुठेही जायचं नसताना, शेवटच्या stop च तिकीट काढायचंय..

ती करेल सारखा फोन म्हणून, बहाणा करून कामाचा तिला टाळायचंय
भेटायचं असताना देखील, लांबूनच तिला ताटकळताना बघायचंय ..

ती रागावेल खूप म्हणून, दुसरीशी लाडीकपणे बोलायचंय
अनावर राग तिचा बघून, रुसवा फुगवा घालवताना तिचा सहज तिला कवेत घ्यायचय..

सुमित 9867686957

Nilesh Upase