सांज वेळ...

Started by शिवाजी सांगळे, October 07, 2014, 02:11:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ढळली रे सांज हि
हासू नकोस रे फुला,
आहे मी एकटा इथे
उगी दुखवू नको मला !

असुनी ज्ञात तुला ती
माझी सर्व जीवन कहाणी,
का? देतो याद तीची
या एकांती माझ्या मनी ?

अल्लड पणे झुकू नकोस
चुंबया तू या धरणीला,
का दाखवितोस ही प्रीत ?
तुझी या विरही मनाला ?

फसलो रे मिलनात खोटया
आवर तुझ्या भावनांना,
आहे सर्व झूट येथे
गुंतवू नको तुझ्या जीवना !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९