* लावणीसम्राज्ञी*

Started by amolbarve, October 08, 2014, 10:21:04 PM

Previous topic - Next topic

amolbarve

*माझी कविता*
*लावणीसम्राज्ञी *
तमाश्याची आन होती
कलेची रे जान होती
पायामधी घुंगर
नाचत अशी छान होती

अंगावरी नववारी
आंबाड्याची शान होती
नजरेच्या पडद्याला
काळजाची किनार होती

कामुक ह्या देहात
पोटाची रे आग होती
जनमानसाच्या शिटीला
काळजाची साद होती

लावणीच लावण्य
महाराष्ट्राची शान होती
घडलेल्या ह्या सेवेत
लावण्यवती महान होती