माझी आजी

Started by Shraddha R. Chandangir, October 09, 2014, 03:24:12 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

होती माझी एक मैत्रीण....
बाबांनी रागावताच
मला पदराखाली घालणारी...
आईने ओरडताच तीच्यावर
रागावणारी....
माझ्यावर जीवापाड प्रेम
करणारी....

आईचे दीलखुलास गार्हाणे करण्यात
दुपार आमची रंगायची....
आईने ऐकताच तीला बहाणे
सांगण्यात मग
फजीती आमची व्हायची....

पिरक्षेत कमी मार्क मीळुन
जेव्हा व्हायची मी उदास.....
माझ्या नकळतच
कुठेतरी तीलाही व्हायचा त्रास....

जवळ मला घेऊन मग अश्रु माझे
आवरायची.....
नवीन उमेद आिण जोश देत अलगद
मला सावरायची....

लग्नापर्यंत तुझ्या मी असेल का? असं
नेहमी ती म्हणायची....
का गं आजी असं म्हणते? म्हणुन
मी ही मग चीडायची....

प्रेम आिण जीव्हाळ्याने तीच्या,
नकळतच मी मोठी झाली....
वाटा दुभंगून आपल्या, मग
मी स्वप्नांच्या दीशेने झेपावली.....

काळजी घे ग पोरी,
मी जातांना ती म्हणाली.....
तीच््या आठवणींचं गाठोडं बांधून मग
मी ही हसत नीघाली.....

दीवसांमागुन दीवस गेले,
सरल्या जुन्या आठवणी....
वीरह तीचा सहन न होता, हळूच
तरंगायचं डोळ्यात पाणी.....

संध्याकाळी त्या अचानक
बाबांचा फोन आला..
तीु आमच्यातून
कायमची हरवल्याचा मजकूर
मला मीळाला....

देवासमोर हात
जोडतांना आजही सतत वाटतं...
आपल्या माणसांना हीराऊन
देवाला तरी काय मीळतं??

शेवटी आपल्या वाटेला आलेलं दु:ख
आपणच सहन करायचं असतं.....
जगण्याची रीतंच अशी, हसून
स्वीकारायचं असतं.....
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]