वेगळ...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 09, 2014, 05:03:36 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कधीकधी रडताना
कोणाच सान्त्वन करताना
वेगळच वाटत असत...
भिजलेले डोळे कोणाचे पुसताना
समजूत काढताना
वेगळच वाटत असत...
दाटलेले अश्रु लपवताना
लपवत लपवत पुसताना
वेगळच वाटत असत...
गुपचुप कोणावर प्रेम करताना
मनातल्या मनात झुरताना
वेगळच वाटत असत...
कुणाला लपून लपून पाहत़ाना
पाहून पाहून हसताना
वेगळच वाटत असत
पण हे वेगळ म्हणजे नक्की काय
हेच कळत नसत..
.... अंकुश नवघरे
(स्वलिखित) रात्रो.. ९.५१. ०७.१०.२०१४