* स्वप्न *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 09, 2014, 06:27:45 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* स्वप्न *
तीन राञी तुझ्या जवळच्या
गेल्या मला सांगुन
स्वप्न होते रे वेड्या
का गेलास तु रंगुन

जागा झालो मग काल
पण स्वप्न गेले माझे भंगुन
एकटाच होतो आधी
एकटाच गेलो आताही राहुन

हातातल्या कळ्या सा-या
उमलण्याआधीच गेल्या जळुन
फुलपाखरें हातावर बसलेली
ती ही गेलीत उडुन

आकाशीचे तारे सारी
घेतली काल मोजुन
पौर्णिमेच्या चंद्रालाही
अमावस्याने टाकले गिळुन

राञीचे प्रहर ही आता
एकामागुन एक गेलेत ढळुन
तरी अश्रुं नाही बरसले
या दोन डोळ्यांतुन

नशीब माझेच माझ्यावरती
गेले असे का रुसुन
स्वप्न माझे स्वप्नच राहिले
गेले ते भंगुन...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

9970995363