*** भेटशील ना ***

Started by Lyrics Swapnil Chatge, October 10, 2014, 08:51:07 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

**** भेटशील ना****

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला' सागंना...

नभी चंद्राची चादंणी,तशी सोबत तु साजणी...
हातात हात गुफंवूनी,साथ मला देशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला' सागंना...

फुलली बागे सुमनानी,गंध दरवळला रानोरानी...
परी होवून 'सुगंध' तु,मनी छेडून जाशील ना...

सागं ना सागं ना सागं ना,
'भेटशील ना तु मला' सागंना...

मनी उठले वादळ भावनेचे,अलगद भिजले काठ पापणीचे...
अबोल तु होवून शब्द,ओठावर माझ्या मोहरशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला' सागंना...

काळोख राती पसरुन काजवे,साद घालती माझी आर्जवे...
परी विसरुन तु भान तुझे,तुझ्या मिठीत मला घेशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला' सागंना...!!


-------------------------------
© स्वप्नील चटगे.
दि.10-10-2014

Lyrics Composed...Swapnil Chatge
-------------------------------