कळेल तरी असे का झाले ?

Started by Anil S.Raut, October 10, 2014, 09:02:05 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

राहु देे आज मला एकटेच
कळेल तरी असे का झाले ?
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?

सारेच क्षण तसे
वाट पाहण्यातच गेले
जे आले मिलनाचे वाट्याला
ते ही भांडण्यातच गेले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

हसणे तर माझे
विरहातच जळून गेले
मीठीतले चार क्षण
तुझ्या रडण्यातच गेले....
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले?
कळेल तरी असे का झाले ?

भुकेचे नामोनिषाण असे
विचारात मिटून गेले
दोन घास पोटात अन्
बाकीचे मोरीत वाहुन गेले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

जागून सारी राञ
तुझेच मी स्वप्न पाहिले
उलटुन गेले असेच प्रहर
हाती ना काही लागले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

छान केले दुनियेने
याला प्रेम असे नाव दिले
आयुष्य फुलणे राहिले दूर
झुरणे माञ नशिबी आले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?


*अनिल सा.राऊत*
9890884228