निष्कर्ष

Started by tanu, November 05, 2009, 04:31:25 PM

Previous topic - Next topic

tanu

दारू मुक्ती केंदाचा वर्ग सुरू असतो. प्राध्यापक मद्यांदे सरांच्या टेबलावर एक व्हिस्कीचा, एक व्होडकाचा, एक रमचा, एक गावठीचा, एक टकिलाचा आणि एक वाईनचा ग्लास ठेवलेला होता. वर्गाचं लक्ष त्या ग्लासकडे लागलंय हे पाहून सरांनी सहा किडे आणले आणि एक एक करून त्या ग्लासात सोडले. सोडताच क्षणी अर्ध्या अर्ध्या मिनिटांच्या फरकाने ते किडे बिचारे तडफडून मरूनच गेले. अचंबित झालेल्या चेहऱ्यांकडे विजयी नजरेने सरांनी तिरपा कटाक्ष टाकला.

मद्यांदे सर : तर.. काय कळलं तुम्हाला यातून?

गंपू : काय तर काय. शिंपल! याचा अर्थ की नाय गुजीर् की कोणती पण दारू प्या. पोटातले किडे-जंत मरणार म्हणजे मरणार.