असेल जडला जीव तुझा माझ्यावर....

Started by Anil S.Raut, October 11, 2014, 09:03:40 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

असेल जडला जीव तुझा माझ्यावर
म्हणून तर अशी चोरून पाहते आहेस....

नजरेला नजर भेटताच तुझी माझ्या
लाजून तू नजर कैकदा चोरते आहेस....

रंगवून स्वप्ने मनातल्या मनात प्रेमाची
हळूच गाली एकटीच तू हसते आहेस...

करून लाडीक चाळे मुलायम जुल्फांशी
माझ्यातच सर्वथा अशी तू गुंतते आहेस...

करुन बहाणा उगीच घसरलेल्या पायाचा
प्रेमात माझ्या सपशेल तू पडते आहेस....

कर ना बिनदिक्कत कबुल तू आज
का उगी मला झुरणी तू लावते आहेस....

असेल जडला जीव तुझा माझ्यावर
म्हणून तर अशी चोरून पाहते आहेस...!


*अनिल सा.राऊत*
9890884228