**** खेळ मनाचा ****

Started by Lyrics Swapnil Chatge, October 13, 2014, 07:50:21 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

**** खेळ मनाचा ****

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
एकाकी कणकण तिच्या आठवणीत झुरण्याचा...

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
नसताना सोबत ती क्षणक्षण तिला आठवायचा...

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
मनाच्या पाखराला आकाशात उंच मिरवण्याचा...

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
अलगद मिटून पापण्या तिला डोळ्यात साठवयाचा...

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
धुदंलेल्या क्षणी मनात नव्या भावना जागवण्याचा...

किती छान असतो ना हा खेळ मनाचा,
तनावर तिच्या चिबं पावसाची थेबं होवून ओघळण्याचा...

खरचं किती छान असतो ना हा खेळ मनाचा...

-------------------------------
© स्वप्नील चटगे.
दि.12-10-2014
(www.aishwswapn143.blogspot.com)