|| पोरी जरा जपून मतदान कर .. ||

Started by Çhèx Thakare, October 13, 2014, 06:46:47 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

पोरी जरा जपून मतदान कर ..

( रेगे चिञपटातील पोरी जरा जपून दांडा धर च्या चालीवर )

शाळा सुटली, युती तुटली
शाळा सुटली, युती तुटली
अन आघाडीच नाही काही खर

पोरी जरा जपून मतदान कर
पोरी जरा जपून मतदान कर

अन पहील्याच वेळेला
अन पहील्याच नेत्याला ..(2)

मी मतदान केल वेळ-काळ वाल्याला
मग सिंचन घोटाळे
अन वेगळी विधाने
सिंचन घोटाळे, वेगळी विधाने
सिंचन घोटाळे, वेगळी विधाने
आल सगळच जनते समोर

पोरी जरा जपून मतदान कर
पोरी जरा जपून मतदान कर

मग दुसरयाच वेळेला
अन दुसरयाच नेत्याला ..(2)

मी मतदान केल, एक हात वाल्याला
मग भ्रष्टाचारा च
अन महागाई च
भ्रष्टाचाराच, महागाईच
भ्रष्टाचाराच, महागाईच
पाणी गेलच डोक्यावर

पोरी जरा जपून मतदान कर
पोरी जरा जपून मतदान कर

मग तिसरयाच वेळेला
अन तिसरयाच नेत्याला ..(2)

मी मतदान केल आगगाडी वाल्याला
मग वेळ गेली ती
काम झाली नाही
वेळ गेली ती, काम झाली नाही
अन काहीच झाल नाही खरं

पोरी जरा जपून मतदान कर
पोरी जरा जपून मतदान कर

©  चेतन ठाकरे

( टिप : या कवितेचा कुठल्याही नेत्याशी अथवा पक्षाशी
काहिच सबंध नाही. अढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, आणि हो नुसतीच पोरी नाय तर आपण सर्वांनी मतदान करा.  )