मी फक्त तुझ्यासाठी

Started by amol thackeray, October 15, 2014, 11:53:31 AM

Previous topic - Next topic

amol thackeray

दु:खमय सागरातील
बेट मी एकांती
परतविली वादळे
मी फक्त  तुझ्यासाठी..........

तू शब्द ना उच्चार ला
ही वाट जेथे वळाली.
ओठ साक्ष देत होते
ते फक्त तुझ्यासाठी. ...........

भरला ना एकही हुंदका
ना आसवे गळाली.
त्यांना ही शिस्त लावली
मी फक्त तुझ्यासाठी. ...........

तू परतशील तेव्हा
असतील लाकडे जळाली
राख ही हुंकरीन
मी फक्त तुझ्यासाठी.........
Unknown author. .......