शिकाल तरच टिकाल

Started by virat shinde, October 17, 2014, 09:31:39 AM

Previous topic - Next topic

virat shinde


"शिकाल तरच टिकाल"


भारत भुमिवर खुप पिढ्यांपासुन सांस्कृतिक, धार्मिक व शिक्षण क्षेत्रात परकीयांची सत्ता आहे. या सत्ताधार्यानी आमच्या समाजाला मनुस्मृती नुसार शुद्र ठरऊन शिक्षणा पासुन वंचीत ठेवले. पण आमच्या महापुरुषांनी त्याची गुलामी नाकारून बहुजनांना शिक्षण दिले. बाबासाहेबांच्या कायद्याने तर ति गुलामी पालथी पाडली व बहुतांनी शिक्षणात प्रगती केली तरच ते या प्रस्थापितांशी कडवी झुंज देउ शकतील. हा लाख मोलाचा संदेश आपल्या महापुरुषांनी आपल्याला दिलाय. यामागील हेतु हाच की बहुजनांनी शिक्षण घेउन त्यांची ज्ञान कक्षा रूंदवावी व खरे काय खोटे काय याची त्यांना जाणीव व्हावी, ईतका स्पष्ट व सुंदर हेतूच या मागे होता.  शिक्षण म्हणजे तरी काय ? हा प्रश्न आनेक जनांना आहे. आणि तो प्रश्न जणांचा अनुत्तरीतच आहे. तर या सर्वांना संत तुकाराम महाराज म्हणतात- "ओले मुळ भेदी खडकाचे आंग।
अभ्यासासी सांग कार्यसीध्दी"
फुलेसाहेब म्हणतात- "सत्य असत्याची जाण शिक्षण करून देत"  तर बाबासाहेबांनी  शिक्षणास "वाघीणीचे दुध म्हटलं आहे"  यावरून आपला प्रश्न लोप पावतो व आपन शिक्षण याच साठी घेतो की जगता यावे जिवन सुंदर पणे. शिक्षण हे आज्ञाना कडून विज्ञानाकडे जान्याचा मार्ग आहे.  शिक्षण आपले भक्षण होनयापासुन रक्षण करते. हाच शिक्षणाचा अर्थ आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवला आहे. त्यामुळे आपण सारे शिकुया आणि देशात टुकूया. पण सध्या कार्यरत आसलेली शिक्षण व्यवस्था सदाशिव पेठेतील शिक्षण देते त्यामुळे मोठा घोळ झालाय.  आणि इतकाही अती शहाणपणा शिकवणारी शिक्षण पद्धती सोडुन नव्या युगाशी नाते जोडत आम्ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे शिक्षण घेऊत. आणि मग कुणी विचारलच "शिक्षण काय देत पदवी का व्यक्तीमहत्व ? तर ताठ मानेनं सांगू कि शिक्षण व्यक्तीमहत्वच देत, हेच व्यक्तीमहत्व आम्हाला शिकवेल
डोक्यात काय पिकत त्यापेक्षा बाजारात काय विकत. व आम्ही सारे शिक्षीत होऊनं विकशीत होऊ...


✒विराट शिंदे (9673797996)