[Computers] गेमिंगचं अनोखं विश्व

Started by madhura, November 08, 2009, 09:14:42 PM

Previous topic - Next topic

madhura

ऑनलाइन गेम्सचं विश्व अफाट पसरलंय. त्यात रमणाऱ्यांना ते वेगळ्या जगात नेत असतं. क्लिकसरशी आपल्या र्व्हच्युअल जगात आपण काहीही करण्याची ताकद अनेकांना त्यात गुंतायला लावते. मुलं तर तासनंतास या गेम्समध्ये अडकल्याने मैदानावर जाऊन खेळायचं असतं हेही विसरून गेली आहेत. तर तरुण, वयस्क सगळ्यांनाच याचं वेड लागलंय. गृहिणींसाठीही हा वेगळा टाइमपास ठरलाय.
.........

* किचन गेम्स...
र्व्हच्युअल जग मोठं मजेशीर असतं. आपल्याला जे प्रत्यक्षात जमत नाही ते करून पाहण्याचं स्वातंत्र्य या जगाने दिलंय. त्यामुळे त्या जगात रमणारी जशी लहान मुलं असतात तशी तरुण मंडळीही असतात. अगदी आजी-आजोबा अशा व्हच्युअर्ल जगात आनंदाने आपण दुखणं विसरून मस्त जगत असतात. यातले गेम्स हा एक टाइमपास पण खूप खिळवून ठेवणारा प्रकार.

मुलींसाठी विशेषत: महिलांसाठी काही गेम्स असतात. त्यात चावटपणा असतो, असं काही सांगतिल पण तसं नाही. काही गेम हे प्युअरी गेम्सच असतात. त्यापैकी एक प्रकार आहे किचन गेम्स. अशा गेम्समध्ये रंगणाऱ्या साध्यासुध्या गृहिणीही असतात किंवा एखाद्या कापोर्रेट ऑफिसची बॉसही असेल. खरं तर उंदरांना किचनमध्ये प्रवेश असू नये पण इथे मात्र माऊस असायलाच हवा. अनेक मुलींना मोहन आणि फोडणी यातला फरक कळत नसतो. तसा सिझनिंग आणि गानिर्शिंग यातला फरक माहीत असत नाही. त्यांच्यासाठी असे गेम्स म्हणजे भन्नाट असतो. एखादा पदार्थ कसा बनवणार यासाठी तुमच्याकडे गॅस असण्याची गरज नाही, त्यासाठी एक क्लिक पुरेसा असतो. आणि मग एक-एक क्लिक नंतर तुम्ही एखादा व्हच्युअर्ल पदार्थ बनवून चक्क पॉइण्ट कमवू शकता.

काही इंटरअॅक्टिव्ह गेम्सही असतात. यात तुमच्या आईने सांगितलेल्यापेक्षा वेगळ्या रेसिपीज बनवता येतात. काही सूचना आणि अॅनिमेटेड कॅरेक्टरच्या मदतीने तुम्ही रेसिपी बनवू शकता. एखादीच्या हातचा पदार्थ बिघडला, करपला तर त्यासाठी कोणी नाकंही मुरडणार नाही. त्यामुळेच या गेमची मजा आणखी वाढत जाते. मुळात यातले अनेक गेम्स हे स्वयंपाक बनवणं हे फन ठरावं, यासाठी बनवले जातात.

* जाहिराती आणि सिरीअल्सही
नुसत्या सिनेमांचे नाही तर काही लोकप्रिय सिरीअलवर आधारित गेम्सही आहेत. पती पत्नी और वोह या सध्याच्या रिअॅलिटी शोवरचाही गेम आहे. त्यात तुम्ही मुलाला कसं सांभाळता यावर तुमचे पॉइण्ट ठरतात.

* सिनेमा गेम्स...
ऑनलाइन आणि मोबाइल गेम्स यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिनेमाच्या थिमवरचे अनेक गेम्स आता पॉप्युलर होत चालले आहेत. पूवीर् सिनेमाचे निर्माते सिनेमा चालण्याच्या वेगवेगळ्या शक्कल लढवायचे. पण सिनेमा चालला नाही तर सगळंच मुसळ केरात जायचं. मग त्यावर उत्तर मिळालं ते चांगलं संगीत असेल असं पाहून त्याच्या आल्बम रिलीजमधूनच पैसे कमवले जायचे. आता कॅसेट, सीडी खरेदी करणंच कमी झालंय. मग करायचं तर रिंगटोन आणि गेम्सचा पर्याय समोर आलाय. जपान आणि युरोपात सिनेमापेक्षाही ही गेम्स इंडस्ट्री जास्त कमाई करून देणारी ठरली आहे. त्यामुळे आपल्याकडच्या निर्मात्यांना सिनेमांचे गेम्स तयार करून त्यावर आणखी फायदा मिळवावासा, वाटला तर त्यात नवल काय. त्यामुळेच सध्या जो नवा सिनेमा येतोय त्याचे गेम्स ऑनलाइन, मोबाइलवर जास्त पॉप्युलर ठरताहेत.

गेम्स पॉप्युलर व्हायला सिनेमा चालला पाहिजे, असं अजिबातच नाही त्यामुळे सिनेमाचे निर्मातेही खुशीत आहेत. सिनेमातल्या कथानकावर आधारित प्लॉट आणि सिनेमातल्या कॅरक्टर यांच्याविषयीचे हे गेम असतात. हे चित्रपट सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच माकेर्टमध्ये येतात. त्यामुळे सिनेमाची हवा तयार व्हायलाही मदत होते. सिनेमातले काही प्रसंग, त्याची कथा यांच्या अंगाने जाणारे हे गेम्स डाउनलोड करून घेण्याची सोय असते. काही गेम्स फ्री असतात. पण त्यात सिनेमावाल्यांचा फायदा होतोच. अर्थात अशा गेम्समध्ये सिनेमाचे दिग्दर्शकही आता रस घेताहेत. किंबहुना त्याच्या परवानगीने हे गेम्स तयार होतात.

आगे से राइट, वेक अप सिद, देव डी या सिनेमांचे ऑनलाइन गेम्स जास्त लोकप्रिय झाले आहेत. अगदी 'कमिने'ने गेम्समध्ये आघाडी घेतली. गजनी सिनेमावरील ऑनलाइन गेम तर किमान चार ते पाच लाख लोकांनी डाउनलोड केल्याचा रेकॉर्ड आहे. अर्थात सगळ्याच सिनेमांच्या ऑनलाइन गेम्सला मागणी असं नाही. त्यामुळेच फक्त वेगळ्या प्रकारच्या सिनेमांना या गेम्समध्ये उतरवता येतं......

* भारतीय भाषांमध्ये
हे गेम्स खेळण्यासाठी तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे का, तर नाही तर कारण अनेक भारतीय भाषांतून वेगवेगळे गेम्स देणाऱ्या वेबसाइट्स आहेत. मराठी, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, बंगाली अशा भाषेतही हे गेम्स तयार करण्यात येत आहेत.

* शिकारी सलमान!
सलमान खानचा वॉण्टेड सिनेमा हिट झालाय. त्यावरून एक गेम काढला आहे. त्यात सलमान जंगलात शिकारीला गेलाय. जंगलातल्या जंगली श्वापदाला त्याने मारायचंय. त्यात एक सूचना आहे, डू नॉट शूट ब्लॅक बक. मग विशिष्ट वेळात आणि दिलेल्या गोळ्यांनी जास्तीत जास्त करायची. असा हा गेम पॉप्युलर झालाय.

काळ बदललाय, मैदानातला खेळ घरच्या कम्प्युटरमध्ये शिरलाय, टाइमपासचं नव तंत्र विकसित झालंय. व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर गेम्स, ऑनलाइन गेम्स, मोबाइल गेम्स यांनी बनलेल्या र्व्हच्युअल र्वल्डने कमाल केली आहे. गेमिंग फक्त लहानांपुरतेच नाही तर मोठ्यांसाठीही मनोरंजनाचं साधन बनत आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना अभ्यास, परीक्षा, रिझल्ट यांचं तर पालकांना स्वत:च्या करिअरचं प्रचंड टेन्शन असतंच. हे टेन्शन दूर करणारे फूल टू एन्जॉय करण्याची संधी देणारे असंख्य गेम आज बाजारात उपलब्ध आहेत. प्रवासात खेळण्यासाठी मोबाइलचे गेम, घरात खेळण्यासाठी व्हिडिओ तसंच कम्प्युटरचे गेम बाजारात उपलब्ध झाले आहेत. कम्प्युटवर खेळताना एकटेपणाची जाणीव सतावतेय, मग इंटरनेटच्या माध्यमातून खेळायला मल्टिप्लेयर्स ऑनलाइन गेमही सज्ज आहेत. यात जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी असणारे युझर एकाचवेळी एकच गेम खेळतात. कधी परस्परांच्या विरुध्द खेळतात तर कधी स्वतंत्र स्कोअर करतात आणि आंतरराष्ट्रीय हाय स्कोअरच्या यादीत स्वत:चे नाव दाखल करतात.

सिनेमा, टीव्ही सिरियल आणि कार्टूनचे निर्माते आपल्या कार्यक्रमांसारखीच थिम असलेले गेम बाजारात उपलब्ध करत आहेत. त्याचवेळी रेसिंग, क्रिकेट, सॉकर, टेनिस सारख्या मैदानी खेळांचे र्व्हच्युअल रूपही उपलब्ध आहेच. सूडोकू, क्विझ आणि पझल आहेतच शिवाय फायटिंगचे अत्याधुनिक गेमही आले आहेत. निवडणूक काळात तर राजकारण्यांनाच आपल्या विश्वात सामावून घेण्याची किमया या गेमिंग तंत्राने केली आहे. मागील दहा-पंधरा वर्षात जगात सर्वाधिक चचेर्चा विषय ठरलेले लादेन, सद्दाम आणि जॉर्ज बुशही गेमच्या जगात दाखल झाले आहेत.

हे कमी म्हणून आता एखादी वस्तू तयार करा, इमारत बांधा, तुमचे गाव किंवा शहर यांचे शत्रूपासून रक्षण करा इथपासून ते स्वयंपाक करा, गेममधल्या मॉडेलला झटपट मॅचिंग कपडे घाला सारखे प्रकारही गेमच्या दुनियेत आले आहेत.

तुमचा मोबाइल किंवा तुमच्या शरिराला जोडलेला विशिष्ट नियंत्रक यांच्या माध्यमातून तुम्ही थेट गेमच्या विश्वात प्रवेश करता. नियंत्रक बसवून तुम्ही पळू लागताच गेममध्ये तुमचा र्व्हच्युअल अवतार पळू लागतो. तुम्ही विशिष्ट कृती करता अगदी तशीच कृती तो अवतार करतो आणि गेममधल्या शत्रूपासून दूर जातो किंवा थेट हल्लाच करतो. मोबाइलमध्ये तुमच्या फोनला झटका देऊन तुम्ही बॉल विशिष्ट दिशेला ढकलू शकता. या नव्या टेक्नॉलॉजीमुळे तर गेमिंग आपल्या जीवनाशी निगडीत घटना स्वत:मध्ये सामावून घेऊन आपणच रिअल र्वल्ड असल्याचा भास निर्माण करू लागले आहे.
.....

गेमिंगच्या भारतात लोकप्रिय असलेल्या वेबसाइट

www.gamekhel.com
www.zapak.com
www.game.co.in
http://god.indiagames.com
www.miniclip.com
www.shockwave.com/home.jsp
http://www.flash-game.net
http://games.yahoo.com
http://games.sify.com

gaurig